Friday, January 27, 2023

धोनीच्या भविष्याबद्दल चेन्नईच्या मालकांनी केलं मोठं विधान ; म्हणाले की….

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी अतिशय साधारण राहिली. आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचसोबत महेंद्रसिंग धोनीलादेखील पहिल्यांदाच संपूर्ण हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. धोनीच्या या कामगिरीनंतर धोनी IPL मधूनही निवृत्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना धोनीने त्यावर स्पष्टपणे उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी धोनीसंदर्भात एक महत्ताची माहिती दिली आहे.

धोनी आणि चेन्नई संघाचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. मी म्हणेन की हे एक वाईट वर्ष होतं. धोनी संघाचा कर्णधार होता आणि तो यापुढेही संघाचं नेतृत्व करत राहील. धोनीने संघातील बदलाबाबत काही गोष्टी सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सांगितल्या. त्या बोलण्यामागे त्याचा नक्की काय हेतू होता हे मला चांगलंच माहिती आहे. त्याने या सर्व गोष्टींबाबत माझ्याशी चर्चा केलेली आहे”, असे श्रीनिवासन यांनी मिररशी बोलताना स्पष्ट केलं.

- Advertisement -

“दहा यशस्वी वर्षांनंतर एखादं वाईट वर्ष आलं तर त्याने खचून जायचं नसतं. पुढल्या वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू याची मला खात्री आहे. ऋतुराजबद्दल बोलायचं तर तो करोनाच्या आजारातून थोडासा उशीरा सावरला. फाफ डु प्लेसिसने म्हटल्याप्रमाणे त्याच्यात तरूणपणी खेळणाऱ्या कोहलीची झलक दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला बऱ्याच दिवसांनी इतका चांगला आणि गुणवान खेळाडू मिळाला आहे. ऋतुराज नक्कीच विराट कोहलीसारखा यशस्वी होईल”, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’