चेन्नईसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. याचबरोबर CSK संघाला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. तब्बल एक महिन्यानंतर संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाडचा आयसोलेशन कालावधी संपला आहे. ऋतुराजने सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई संघानं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. फोटो शेअर करत चेन्नईने ऋतुराज गायकवाडचं मैदानावर स्वागत केलं आहे.

तब्बल एक महिना ऋतुराज आयसोलेशनमध्ये होता. गेल्या आठवड्यात त्याची दुसरी कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आता ऋतुराज फिट झाला आहे.स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला यंदा सुरेश रैनाच्या जागेवर चेन्नईच्या संघात स्थान मिळणार अशी चर्चा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like