चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का!!!! सुरेश रैना आयपीएल मधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्ज चा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना ने आयपीएल मधून माघार घेतल्याच धक्कादायक वृत्त समोर आले आहे.याबबद्दलची माहिती सीएसकेचे सीईओ के एस विश्वनाथन यांनी  ट्वीटरद्वारे दिली आहे. वयक्तिक कारणामुळे रैना मायदेशी परतणार असून आम्ही सर्व या कठीण समयी रैनाच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत असंही ते म्हणाले.

सुरेश रैना आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी रैनाने चेन्नई कडून 400 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. तसेच आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा काढण्यात रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रैनाची  अनुपस्थिती  चेन्नईला नक्कीच जाणवेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment