खाऊगल्ली | उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते, त्यामुळे ज्या फळांमध्ये किंवा फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी फळे किंवा त्यांचा ज्यूस पिणे उत्तम असते. काकडीचा ज्यूस उन्हाळ्यात पिल्याने आपल्या शरीराला ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. तसेच काकडी त्वचेसाठी पण गुणकारी आहे.
साहित्य –
१) १ काकडी
२) लिंबाचा रस १ चमचा
३) साखर ४ चमचे
४) थंड पाणी १ ग्लास
५) मीठ
कृती –
काकडी चांगली धुऊन त्याचे साल कडून घ्या आणि काकडीचे मोठे कप करा.
मिक्सरच्या भांड्यात काकडीचे काप, लिंबाचा रस, साखर, मीठ आणि थंड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
तयार आहे थंडगार काकडीचा ज्यूस.
( टीप – आवडत असल्यास पुदिना, आले टाकू शकता. )
इतर महत्वाचे –
श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात
मिरजेत आयपीएस अधिकारी संदीप गिल यांची धडाकेबाज कामगिरी