Business Idea : कमी खर्चात ‘या’ भाज्यांची लागवड करून कमवा लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही शेतीच्या (Agriculture) माध्यमातून अगदी कमी पैशात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त आणि जास्त मेहनत सुद्धा करायला न लागणारी अशी एक जबरदस्त (Business Idea) बिझिनेस आयडिया देणार आहोत. होय, आम्ही बोलत आहोत महागड्या भाज्यांच्या शेतीबाबत… आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्या (Vegetables) सांगत आहोत. ज्याचा भाव बाजारात 1200 ते 1500 रुपये किलोने विकला जातो. कधीकधी त्यांच्या किमती 2000 रुपये किलोपर्यंत पोहोचतात. या भाज्यांची लागवड भारतात कमी आहे. मात्र, अलीकडे भारतातील शेतकरी सुद्धा जागृत झाला असून आता शेतकरी अनेक प्रकारची पिके घेत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात या महागड्या भाज्या पिकवल्या तर अवघ्या कमी कालावधीतच तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. चला जाणून घेऊया यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश आहे.

zucchini

झुचीनी ची शेती – (Zucchihi) 

झुचीनी आरोग्यासाठी आणि चवीसाठी सर्वोत्तम मानली जाते. अनेक फास्ट फूडच्या वाढत्या सेवनामुळे अनेक लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. अशावेळी वजन कमी करण्यासाठी झुचीनीचा उपयोग होतो. त्यामुळे बाजारात झुचिनीला नेहमीच मागणी असते. झुचिनीची शेती करून तुम्ही मोठी कमाई करू शकता.

Shatavari

शतावरी लागवड- (Shatavari) 

शतावरी भाजी ही भारतात मिळणाऱ्या महागड्या भाज्यांपैकी एक आहे. या वनस्पतीच्या पानांचा उपयोग बहुतेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे शतावरी मागणीही बाजारात जास्त आहे. सध्या बाजारात त्याची किंमत 1200 ते 1500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे शतावरीची लागवड करून शेतकऱ्यांना एक एकरात 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

Cherry Tomatoes

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात भाज्यांची किंवा फळांची लागवड करायची असेल आणि रोपे विकत घेताना किंवा त्याबाबतच्या माहितीबाबत अडचण येत असेल तर चिंता करू नका. हॅलो कृषी हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि तुमच्या आसपासच्या रोपवाटिका मालकाशी थेट संपर्क साधा. यामाध्यमातून तुम्हाला हवी ती रोपे तुम्ही अगदी कमी खर्चात आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळेत मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते छोटा व्यापारी यांना एकमेकांशी जोडणाऱ्या Hello Krushi च्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येतो. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

चेरी टोमॅटोची लागवड – (Cherry Tomato)

अनेक तज्ञ चेरी टोमॅटो खाण्याची शिफारस करतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारातील त्याच्या सध्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 350-450 रुपये किलो दराने सहज विकले जाते. विशेष म्हणजे चेरी टोमॅटो वाढवणे किंवा लागवड करणे हे अवघड काम नाही, तर ते ट्रे किंवा खड्ड्यात उगवता येते. पुरेशा ओलाव्यासाठी सिंचन किंवा ठिबक सिंचनाच्या द्वारे देखील याची लागवड करता येते.

boak tea

बोक चहाची लागवड –

ही एक दुर्मिळ भाजी असून भारतात त्याची लागवड फारच कमी आहे. परंतु अलीकडच्या काळात भारतीय शेतकऱ्यांनीही बोक चहाची शेती सुरू केली आहे. त्याची देठ बाजारात 120 रुपयांना विकली जाते. त्यामुळे बोक चहाच्या शेतीतून सुद्धा तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.