औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येणे कठीण होत असल्याने 19 मार्चपासून जिल्ह्यात रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. या निर्णयाची अंमलबजावणी होईल. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या वतीने हे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी रात्री अकरा आणि त्यानंतर नऊ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती. चव्हाण म्हणाले की, अनेक लोक गल्लीबोळात अनावश्यक गर्दी करत आहेत. काम नसताना फिरत आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
यांना मिळणार सूट
संचार बंदीच्या निर्णयातून वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, उद्योग, कारखाने, दूध विक्री, पेट्रोल गॅस एजन्सी, बांधकामे, बँकांना सूट मिळणार आहे. या क्षेत्राशी संबंधित लोकांवर कारवाई होणार नाही.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा