पुण्यात 20 तारखेपर्यंत जमावबंदी लागू ; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे.

अमरावतीत सलग सुरु राहिलेल्या हिंसाचारामुळे तेथे चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पाठोपाठच खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागात जमाव गोळा करण्यास मनाई असणार आहे.

या नियमांचे करावे लागणार पालन-

कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हाॅटसअप, टि्वटर, फेसबुक आदी सोशल माध्यमांवर जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवल्यास कठारे कारवाई करण्यात येईल.

पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास , सभा घेण्यास मनाई असेल.

कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे पोस्टर लावणे ,व त्या प्रकारच्या घोषणा देणे गुन्हा समाजाला जाईल.

Leave a Comment