हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय माणसाच्या दिवसाची सुरुवात देखील होत नाही. हा स्मार्टफोन खरेदी करताना वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी केली जाते. आणि त्यानंतरच खात्री पटल्यावर आपण हा फोन विकत घेतला आज घेतो. आजकाल स्मार्टफोनमध्ये फ्लॅट स्क्रीन फोन आणि कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले असलेला फोन उपलब्ध आहे. परंतु यापैकी कोणता फोन खरेदीसाठी चांगला आहे. असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला यात दोन्ही मॉडेल्सचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला फोन खरेदी करतांना याचा वापर होईल.
आजकाल लोकांना स्टायलिश फोन हवा असतो. त्यामुळे अनेक कंपन्या देखील आणि स्टायलिश लुक असलेले फोन बनवत आहे. मार्केटमध्ये कर्व्ड डिस्प्ले फोन आणि फ्लॅट डिस्प्ले फोन देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की फ्लॅट स्क्रीन वाला मोबाइल घ्यावा की, कर्व्ड स्क्रीन वाला मोबाइल घ्यावा? आता त्याचे फायदे तोटे जाणून घेणार आहोत
फ्लॅट स्क्रीन फोनचे फायदे आणि तोटे
- या फ्लॅट डिस्प्ले स्क्रीनवर टेम्पल ग्लास लावणे खूप सोपे आहे आणि सुरक्षित देखील आहे.
- यामुळे तुमच्या स्क्रीनवर बबल येण्याची शक्यता जास्त आहे.
- फ्लॅट डिस्प्ले असलेले फोन हे कर्व्ड डिस्प्ले असलेल्या फोन पेक्षा स्वस्त असतात.
- फ्लॅट डिस्प्ले स्क्रीनवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव जास्त चांगला येत नाही.
कर्व्ड स्क्रीन डिस्प्लेचे फायदे तोटे
- कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन दिसायला खूपच आकर्षक दिसतात.
- या मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव खूप चांगला असतो.
- कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन हे सामान्यतः फ्लॅट डिस्प्ले असलेल्या फोन पेक्षा महाग असतात.
- टेम्पल ग्लास कर्व्ड डिस्प्लेवर लावणे तुलनेने अवघड असते