कस्टर्ड फ्रुट सॅलेड

0
47
Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | कस्टर्ड फ्रुट सॅलेड खायला सर्वांनाच आवडेल. यामध्ये बऱ्याच फळांचा वापर केल्यामुळे ते सॅलेड पौष्टिक बनते. हे सॅलेड सोप्या पद्धतीने बनवता येते जे की, लहानांपासून मोठ्यांपरेंत सर्वांनाच आवडेल. यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता.

साहित्य –
१) ३ काप दूध
२) २ चमचे कस्टर्ड पावडर
३) ४ चमचे साखर
५) १ केळ
६) १ सफरचंद
७) १ डाळिंब
८) १ चिकू
९) १ पेरू
कृती –
गॅस वर दूध गरम करत ठेवा. एका वाटीत थोडे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका. हे मिश्रण गॅसवरील दुधात टाका. तसेच साखर हि टाकून घ्या. दूध चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या.
सर्व फळांचे छोटे- छोटे काप करून घ्या. एका बाऊलमध्ये कापलेले सर्व फळे कडून घ्या. त्या फळांवर वरून थंड झालेले कस्टर्डचे मिश्रण बाऊलमधील फळांवर टाका आणि मिसळून घ्या. हे कस्टर्ड फ्रुट सॅलेड थोडा वेळ फ्रेजमध्ये ठेऊन थंड करून सर्व्ह करावे.

 

 टीप – आपल्या आवडीप्रमाणे कस्टर्ड पावडरचा फ्लेवर घेऊ शकता.
कस्टर्ड फ्रुट सॅलेडमध्ये आईस्क्रीम टाकू शकता.
आपल्या आवडीप्रमाणे फळे कमी-जास्त घेऊ शकता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here