नाना पटोलेंची जीभ कापा अन् एका लाखाचं बक्षीस मिळवा !

nana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप आक्रमक झाली आहे. भारताच्या प्रधानमंत्र्यांवर मारामारीची भाषा करण्याच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते निषेध नोंदवून आंदोलन करत आहे. यातच भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी अजब घोषणा करून सनसनाटी निर्माण केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख रुपये मिळवा अशी घोषणा सुजित जोगस यांनी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दिली आहे. नाना पटोले यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्यावद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केली होती. आणि आता पटोले यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. राणे यांना वेगळा कायदा आणि पटोले यांच्या साठी वेगळा कायदा आहे का असा सवालही भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यावेळी करण्यात आला.

दरम्यान, भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने घोषणाबाजी करून नाना पटोले यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष संदीप हिवराळे, गोविंद ढेंबरे पाटील., जिल्हा चिटणीस सचिन गाडे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, तालुका उपाध्यक्ष करण निकाळजे, गणेश देशमुख उपस्थित होते.