Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Froud : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आपल्या नकळत आपला महत्वाचा डेटा अगदी सहजपणे चोरीला जातो आहे. सध्या हॅकर्सही खूप ऍडव्हान्स झाले आहेत. ते अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. ज्यामुळे आपल्या डेटा सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.

आपला ऑनलाइन डेटा आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला पासवर्ड ठेवणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे आणि डिव्हाइस व्हायरस-फ्री करणे यांसारखे काही मार्ग देखील आहेत. चला तर मग या विषयी महत्वाची माहिती जाणून घेउयात …

Very poor disposal of cyber crime cases in J&K UT - Jammu Kashmir Latest  News | Tourism | Breaking News J&K

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा

सर्च इंजिनमध्ये वेबसाइटची URL टाकण्यापूर्वी ती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करा. आपली एक छोटीशी चूक आपल्याला चुकीच्या वेबसाइटवर घेऊन जाऊ शकते आणि अशा साइट्सद्वारे महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकेल. जर आपल्याकडून अशी एखादी चूक झाली असेल तर लगेचच पासवर्ड बदला. तसेच आपण सर्च करणार असलेली वेबसाइट सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी URL च्या सुरुवातीला असलेले लॉक चिन्ह पहा. Cyber Froud

Cybercrime: Nothing Personal; It's Just Business

स्ट्रॉंग पासवर्ड

आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड. मात्र स्ट्रॉंग पासवर्ड लक्षात ठेवणे इतके सोपे नाही. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी आपल्याला वाक्य रचने सारखे लांबलचक पासवर्ड वापरता येतील. कारण वाक्य लांबलचक असले तरी ते लक्षात ठेवायला सोपे असतात. यामध्ये प्रत्येक पहिले अक्षर हे कॅपिटल असावे आणि त्यामध्ये एखादा तरी अंक असावा. अशा प्रकारे स्ट्रॉंग पासवर्ड तयार होईल आणि आपल्याला तो लक्षात ठेवायला देखील सोपा असेल.Cyber Froud

The economy involved in cybersecurity - iPleaders

व्हायरस फ्री डिव्हाइस

कोणत्याही प्रकारच्या व्हायरसला आपल्या डिव्हाइसमध्ये येऊन देऊ नका. इंटरनेट किंवा कोणत्याही एक्सटर्नल डिव्हाइसद्वारे आपल्या डिव्हाइसवर ते येऊ शकतात. हे टाळण्यासाठी एक चांगला अँटी व्हायरस इन्स्टॉल करणे महत्वाचे आहे. याशिवाय, आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी कोणतेही एक्सटर्नल डिव्हाइसेस अजिबात वापरू नका.Cyber Froud

The Biggest Cybersecurity Threats are in Your Organization - Acquired Data  Solutions

सॉफ्टवेअर

आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलच्या सॉफ्टवेअर अपडेटसोबतच आपण वापरत असलेले Apps देखील अपडेट केले पाहिजेत. हे Apps सतत संरक्षणात्मक दृष्ट्या मजबूत केले जातात. जेणेकरून तो कोणत्याही प्रकारे सायबर हल्ल्याचा योग्य पद्धतीने सामना करू शकेल. त्याचबरोबर असे Apps आपल्याला ऑटो अपडेट देखील करता येतील.Cyber Froud

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या :  https://mumbaipolice.gov.in/CCC

हे पण वाचा :

खुशखबर !!! आता Yes Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजच्या किंमती तपासा

Aadhaar Card Update : मोबाईल नंबरशिवाय PVC आधार कार्ड कसे तयार करावे हे जाणून घ्या

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Leave a Comment