रायगडमधील दिवेआगार, श्रीवर्धन किनाऱ्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड । ‘निसर्ग’ चक्रीवादळ अखेर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू परिघ ६० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली. हे वादळ किनाऱ्यावर धडकत असतेवेळी लँडफॉल अर्थात वाऱ्याचा वेग हा प्रतितास १०० किलोमीटर इतका होता. सध्याच्या घडीला वादळाचा प्रवास उरण रोखानं सुरु आहे.

निसर्ग चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादळी वारे या भागात वाहू लागले. वाऱ्याचा जोर इतका होता, की येथे अनेक घरांवरील पत्रे उडाले. मोठमोठे वृक्ष मुळासह उन्मळून पडले. पावसाचा जोर वाढला आणि समुद्रातून येणारी प्रत्येक लाट किनारा ओलांडून किनाऱ्यालगतच्या गावात शिरत आहे. वादळात लाटांचे रौद्र रुप पाहायला मिळालं आहे.

सध्या या वादळाची वाटचाल ठाणे आणि मुंबईच्या दिशेनं सुरु आहे. सोबतच येत्या काही तासांमध्ये वादळाची तीव्रता पाहता येणार आहे. परिणामी बुहतांश भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांमध्ये हे वादळ मुंबईच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर नेमकी काय परिस्थिती उदभवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment