‘निसर्गग्रस्त’ रायगड जिल्ह्याला तातडीची १०० कोटींची मदत- मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड । निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेले पाहता रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर तातडीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.

यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी जण उपस्थित होते.

“तातडीने जे काही करता येईल ते करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यांना ८-१० दिवस लागतील. त्यानंतर नुकसानभरपाई सरकार देईलच पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून १०० कोटी देत आहोत. याचा अर्थ १०० कोटींवर फूलस्टॉप आहे, असा नाही. जशी रायगडसाठी घोषणा केली, तसंच इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, त्यानुसार काळजी घेणार आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Image

कोकणच्या किनाऱ्यावर बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली असून हजारो संसार उघड्यावर पडले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. शेती आणि जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर आहेत. अलिबागच्या काही गावांमध्ये काही गावांमध्ये पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व मदतीची घोषणाही केली.

Image

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”