हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लखनऊमधील काकोरी शहरात मंगळवारी दोन सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्यामुळे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे घराच्या भिंती आणि छत देखील कोसळले आहे. ही मोठी दुर्घटना मृत्युमुखी पडलेल्या मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी घडली आहे. त्यामुळे सर्वजण या घटनेविषयी हळहळ व्यक्त करत आहेत.
लग्नाच्या वाढदिवसादिवशीच गमावला जीव
समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये एकूण पाच जणांचा समावेश आहे. यात जरदोजी कारागीर मुशीर, त्यांची पत्नी हुस्ना बानो, भाची रैया, हुमा, हिना या सर्वांचा समावेश आहे. सुरुवातीला एक मोठा आवाज परिसरात झाल्यामुळे सर्वजण घाबरले होते. काही लोकांनी बाहेर येऊन पाहिल्यानंतर त्यांना मुशर यांच्या घरी आग लागल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी ताबडतोब अग्निशामक दलाला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. पुणे पोलीस आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम मुशर यांचा मृतदेह घराच्या बाहेर काढला.
काही वेळा मध्येच पोलिसांनी इतर सर्वांना देखील घराच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हरवले. यावेळी महिला आणि मुलांचा श्वासोच्छवास सुरू होता. मात्र रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी या चौघांना देखील मृत घोषित केले, सांगितले जात आहे की, खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती यामुळेच सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या अपघाताची माहिती मिळतात एसीपी, सीएफओ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग विझवली.
दरम्यान, मुशीर आपल्या इतर भावांसोबत घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता. मंगळवारी मुशीरच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे. मेहुणा अजमत आपल्या तीन मुलांना घेऊन मुशीरच्या घरी आला होता. या वाढदिवसानिमित्त घराच्या दुसऱ्या खोलीमध्ये स्वयंपाक सुरू होता. येथे दोन सिलेंडर जोडण्यात आले होते. मात्र अचानक खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला यामुळे घराला आग लागली. हे आग एलपीजी गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचली ज्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला.