केप टाउन । माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर आणि भारतीय समुदायावरील वाढत्या हल्ल्यांनंतर उद्भवलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी आपल्या वरिष्ठ मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची एक टीम फिनिक्स येथे पाठविली आहे, जिथे भारतीयांवर सर्वाधिक जातीय हल्ले केले गेले आहेत.
शुक्रवारी डर्बनच्या अॅथक्विनीमध्ये त्यांनी सांगितले की,” त्यांनी पोलिस मंत्री आणि क्वाझुलू नताल प्रांताचे प्रमुख यांना दंगलग्रस्त फिनिक्स (डर्बन) येथे पाठवले होते, जे दोन समुदायांशी बोलणी करतील आणि तेथील परिस्थितीचा अहवाल देतील. यासह ही टीम पीडित भारतीयांनाही भेटेल.” येथे दिल्लीतील दक्षिण आफ्रिकन दूतावासानेही परराष्ट्र मंत्रालयाला या परिस्थितीविषयी माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे फिनिक्स आणि डर्बनच्या आसपासच्या भागात झालेल्या हिंसाचारात भारतीयांना लक्ष्य केले गेले होते. त्यांच्या व्यवसायिक संस्थांमध्ये लूटमार आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. या भागात तणाव अजूनही कायम आहे. ही परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपले समकक्ष नालेडी पांडोर यांच्याशीही चर्चा केली आणि भारतीयांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले. या हिंसाचारात आतापर्यंत 75 हून अधिक मृत्यू झाले आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group