दबंग ३ मध्ये ही मराठी अभिनेत्री सलमान खान ची गर्लफ्रेंड..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सलमान खान त्याच्या आगामी ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणात चांगलाच व्यग्र आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात एक प्रिक्वेल दाखवण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यात एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे.

विशेष म्हणजे पदार्पणातच या अभिनेत्रीला सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे सई. पण, ही सई ‘ताम्हणकर’ नसून मांजरेकर आहे. सई ही अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. दबंगच्या या भागामध्ये चुलबुल पांडे याचा भूतकाळ दाखवण्यात येणार आहे.

त्यात सलमानसोबत सई त्याची नायिका म्हणून झळकणार आहे. चुलबुल पांडे याची बायको जरी रज्जो असली तरी त्याची पहिली प्रेयसी म्हणून सई दिसणार आहे. त्याच्या त्या भूतकाळाचा संदर्भ घेऊनच दबंग 3ची कथा गुंफण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटासाठी आधी महेश यांची मोठी मुलगी अश्वमी हिची चर्चा होती. मात्र, अश्वमीला चित्रपटांमध्ये रस नसल्याने तिच्या जागी आता सईची वर्णी लागली आहे.