टीम, HELLO महाराष्ट्र । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट दबंग 3 रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदू जनजागृती समितीने सांगितले की , केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये. या समितीने सांगितले की, चित्रपटाच्या टायटल सॉंग हूड-हूड दबंग या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
https://www.instagram.com/p/B5VJBy2lWRi/
हिंदु जनजागृती समिती महाराष्ट्र आणि झारखंडचे संयोजक सुनील घोट म्हणाले की, “दबंग चित्रपटाच्या गाण्यात सलमान खानसोबत आक्षेपार्ह पद्धतीने नृत्य केले गेले आहे.” यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमान खानने ऋषीमुनींना ज्या प्रकारे पायापाशी नाचवले तसे ते मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप असे नाचताना दाखवण्याची हिम्मत करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे .
दबंग चित्रपटाच्या या गाण्यात सलमान खान नदीच्या काठावर ऋषीमुनींसोबत नाचताना दिसला आहे. आणि त्याशिवाय शिव-विष्णू आणि ब्रह्माचा पोशाख परिधान केलेल्या तीन लोकांकडूनही तो आशीर्वाद घेतो.
बॉलिवूडमधील सलमान खानच्या दबंग चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे. या पहिल्या चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहिट होते. दबंग 3 हा चित्रपट 20 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि किचा सुदीप मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुदीप खलनायक म्हणून पदार्पण करतोय.