विचारवंतांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अंनिसतर्फे निर्भय मॉर्निंग वॉक..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दाभोळकर, पानसरेंचे खुनी कधी पकडणार ? संतप्त नागरिक व समविचारी संघटनांचा सरकारला सवाल

  कोल्हापूर प्रतिनिधी |

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनाचा छडा लवकरात लागला पाहिजे. या मागणीला घेऊन गेली पाच वर्षे सातत्याने कोल्हापूरात निर्भय मॉर्निंग वॉक काढला जातो. आज उभा मारूती चौक, न्यू काँलेज, शिवाजी पेठेतील प्रमुख मार्गाने हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यावेळी आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे दाभोलकर, जातीयवाद मुर्दाबाद, सनातन मुर्दाबाद आदी घोषणासह मॉर्निंग वॉकची सांगता उभा मारूती चौकात झाली.

पुण्यात नरेंद्र दाभोळकरांची २०१३ ला महर्षी शिंदे पुलावर अज्ञातांकडून हत्या झाली होती तर गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात राहत्या घरी २०१५ ला हत्या झाली होती.
इतकी वर्षे लोटूनही तपास लागत नसेल तर सरकार करतंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करावी यासाठी आम्ही दर महिन्याला येथे मॉर्निंग वॊक चं नियोजन करतो असही यावेळी उपस्थितांनी आणि इतर सहकारी म्हणाल्या.

यावेळी प्रा. डॉ. छाया पोवार यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. उदय नारकर, प्राचार्य टी. एस. पाटील, दलितमित्र व्यांकप्पा भोसले, प्राचार्य डॉ. विलास पोवार, स्वाती कोरे, संभाजी जगदाळे, नवनाथ मोरे, रमेश वडणगेकर, यश आंबोळे आदीसह नागरिक उपस्थित होते.