पुणे | स्वप्निल हिंगे
“पुणं तिथं काय उणं’ असे नेहमीच म्हटले जाते. या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना अनुभवायला मिळाला आहे. “दादा मी प्रेग्नंट आहे” अशा आशयाचं होर्डींग पुण्यातील एका वर्दळीच्या चौकात लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्वे रस्त्यावरील डेक्कन टी पोईंट जवळच्या एका चौकात हे अनोखे होर्डींग येणार्या जाणार्याचे लक्ष वेधून घेत आहे.
हे होर्डीग कोणी लावलंय? आणि ते लावण्यामागचा नक्की उद्देश काय आहे? हे स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमधे त्याबद्दल उत्सुजता वाढली आहे. तसेच होर्डींगवरील अनोख्या मजकुरामुळे पुणेकरांमधे उलट सुलट चर्चा सुरु झालेली दिसत आहे.
होर्डींगच्या खाली एका कोपर्यात ही जाहिरात असल्याचं म्हटल्याने सदर होर्डींग एखाद्या नाटकाचं किंवा चित्रपटाच्या प्रमोशनचं असल्याचं म्हटलं जातंय. पुण्याबरोबरच मुंबई, दादर येथेही होर्डींग झळकलं असल्याने हा दादा कोण आहे यांची सर्वांनाच उत्सुकता लागुन आहे. होर्डिंग चा वापर मुखतं मोठमोठ्या मालिकांच्या जाहिरात साठी, सिनेमाच्या प्रमोशनसाठी होत असतो . पण आता हे भलतेच होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. या आधी ही पिंपरी मध्ये लावण्यात आलेलं “शिवडे”, i am sorry , हे होर्डिंग चांगलंच चर्चेत आल होत. रणवीर सिंग च हि असच “कार्ड मिला क्या” एक होर्डिंग होत पण ते व्यवसायीक दृष्टया होत.