सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने काल कारवाई केली. त्यानंतर माजी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांवर टीका केली. त्यांच्या टीकेचा शिवसेनेचे माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी समाचार घेत देसाईंवर त्यांनी निशाणा साधला आहे. “पाटणचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई गेली तीन टर्म या ठिकाणी होते. पण त्यांची ही शेवटची टर्म असून त्यांना आता पुन्हा नाही, अशी टीका सकपाळ यांनी केली.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्या मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. त्यापूर्वी आज शिवसेनेचे माजी आमदार सकपाळ हे आज सातारा येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संजय राऊत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बीजेपीची वाट लावत होते. त्यामुळे बीजेपीला ते असह्य झाले होते म्हणून कुठली तरी कारवाई करून आत टाकून तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर केलेली ही कारवाई आहे. त्यांना आतमध्ये टाकणार हे आम्हाला माहीत होतं. अशा पद्धतीने जे आमदार फुटलेत त्यातील 80 टक्के आमदार ईडीवाले आहेत, असे सकपाळ यांनी म्हंटले.
आमच्यातील लोकांनी गद्दारी केल्यामुळे निष्ठा यात्रा काढावी लागली – सकपाळ
यावेळी माजी आमदार सकपाळ यांनी शिवसेनेकडून जी निष्ठा यात्रा काढली जात आहे त्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेतील काही लोकांनी गद्दारी केली. त्यांच्या गद्दारीमुळे आम्हाला निष्ठा यात्रा काढावी लागली आहे. आमचा शिवसैनिक जागेवर आहे. शिवसैनिक कुठेही हलले नाही जे गेलेत ते लवकरच पदावरून पायउतार होतील आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे सकपाळ यांनी म्हंटले.