Dagdusheth Ganpati Trust : यंदा गणेशोत्सवात ‘दगडूशेठ’ साकारणार चमत्कारिक जटोली शिवमंदिराचा देखावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dagdusheth Ganpati Trust) मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव राज्यभरात चर्चेचा विषय ठरतात. सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून अनेक गणेश मंडळांची बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. यंदा बाप्पाची आरास काय करायची? कोणता देखावा उभा करायचा? यासाठी अनेक गणेश मंडळांच्या बैठकी सुरु झाल्या आहेत. अशातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदाच्या १३२ व्या गणेशोत्सवाबाबत एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार यंदा दगडूशेठ हिमाचलच्या जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार असल्याचे समजत आहे.

जटोली शिवमंदिरात विराजमान होणार दगडूशेठ बाप्पा

यंदा दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा १३२ वा गणेशोत्सव आहे. नुकतीच यंदाच्या उत्सवाबाबत मंडळाची बैठक पार पडली. आता गणेशोत्सवासाठी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळ सज्ज झालं आहे. (Dagdusheth Ganpati Trust) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी गणेशोत्सवात गणेशभक्तांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या मंदिराविषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया.

रहस्यमयी जटोली शिवमंदिर (Dagdusheth Ganpati Trust)

भारतात हिमाचल प्रदेशात स्थित असलेले जटोली शिवमंदिर हे महादेवाला समर्पित आहे. इथल्या मान्यतेनुसार, या मंदिरात स्वतः महादेव येऊन थांबले होते. असं म्हणतात की, या ठिकाणी महादेवाने तपश्चर्या केली होती आणि म्हणून हे मंदिर अनेक रहस्यांनी समृद्ध आहे. असेही म्हटले जाते की, हे जटोली शिवमंदिर बांधण्यासाठी सुमारे ३९ वर्षे लागली होती. त्याकाळी जेव्हा हे मंदिर बांधले गेले तेव्हा वापरण्यात आलेल्या दगडांवर आज ठोकले असते त्यातून डमरूसारखा आवाज येतो. याचा अनेक स्थानिकांना अनुभव आला आहे. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महादेवाने आपल्या त्रिशूळाचा प्रहार करून येथे जलसाठा निर्माण केला होता. त्यांनी त्रिशूळ जमिनीवर आदळले आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु झाला, असे म्हटले जाते.

कोण साकारणार हा देखावा?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा २०२४ च्या गणेशोत्सवासाठी हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. (Dagdusheth Ganpati Trust) या मंदिराचे हुबेहूब देखावा तयार करण्याची जबाबदारी कलादिग्दर्शक अमोल विधाते यांच्या खांद्यावर आहे. नुकताच या देखाव्याच्या सजावटीचा पूजन सोहळा देखील पार पडला आहे. त्यामुळे आता यंदाच्या गणेशोत्सवाची सगळ्यांना उत्सुकता वाटू लागली आहे.