खाऊगल्ली / काहीतरी चटपटीत खायचे असेल तर दहीवाडा हा उत्तम पर्याय पर्याय ठरू शकतो. दहीवडा हा उत्तम दाक्षिणात्य पदार्थ आहे.
साहित्य –
१) १/२ उडदाची डाळ
२) १/४ मुगाची डाळ
३) १/४ वाटी ओल्या खोबर्याचे पातळ तुकडे
४) चवीपुरते मीठ
५) २ वाटी पातळ ताक
६) तळण्यासाठी तेल
७) दीड वाटी घट्ट दही
८) ५-६ टेस्पून साखर
९) मिरपूड
१०) लाल तिखट
११) चाट मसाला
१२) कोथिंबीर
कृती-
उडीद डाळ आणि मुगाची डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी.पाणी काढून टाकावे.
पाणी न घालता दोन्ही डाळी एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात.गरज वाटल्यास 1 ते 2 चमचेच पाणी घालावे.
वाटलेले मिश्रण आपल्याला दाटसरच हवे आहे. नंतर त्यात मीठ आणि खोबर्याचे पातळ काप घालावेत.
कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात वडे तळून घ्यावे. वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये.
पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
वाड्यांवरून दही घालण्यासाठी भांड्यात घट्ट दही घ्यावे, रवीने नुसतेच घुसळून घ्यावे. त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे. ढवळून घ्यावे. आणि थोडावेळ फ्रीजमध्ये गार करण्यास ठेवावे.
सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड, कोथिंबीर आणि लाल तिखट घालावे.
इतर पदार्थ –