Daily Diet : अन्न हे पूर्णब्रह्म!! निरोगी जीवनशैलीसाठी रोजचा आहार कसा असावा? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Daily Diet) निरोगी आयुष्य कुणाला नको आहे? जगण्यात खरी मजा तेव्हाच जेव्हा आपण व्याधीमुक्त जगत असू. पण बिघडती जीवनशैली आणि त्यात चुकीचा आहार घेण्याने आपल्या आरोग्याची हळूहळू वाट लागत जाते. कालांतराने आपण विविध आजारांना बळी पडलोय हेदेखील समजतं. तर अशा परिस्थितीला तोंड द्यायचे नसेल तर वेळीच आपल्या खाण्यापिण्यावर अर्थात आपल्या आहारावर लक्ष द्या. कारण, व्यायामासारख्या चांगल्या सवयींसोबत चांगला आहार देखील निरोगी आरोग्यासाठी गरजेचा असतो.

ICMR च्या काही तज्ञ मंडळींनी रोजच्या आहारात काय असावे? कोणत्या पोषक घटकांच्या सेवनाने आपण सुदृढ शरीर आणि निरोगी आयुष्य जगू शकतो? याविषयी काही महत्वाची गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊया काय सांगतात तज्ञ.

काय म्हणाले ICMR चे तज्ञ?

ICMR च्या तज्ञांनी खानपान मार्गदर्शक तत्त्वे ही ‘दिन की मेरी थाली’ या शीर्षकासह सादर केली आहेत. जय्यत त्यांनी म्हटल्याप्रमाणे, कमीतकमी ८ खाद्य पदार्थ असावे. (Daily Diet) ज्यातून मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि सुक्ष्म पोषक तत्वे यांचे सेवन व्हायला हवे. यामध्ये भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे यांचा विशेष समावेश असल्याने शरीराला भरून फायबर मिळेल.

तसेच आपल्या दैनंदिन आहारात कडधान्य आणि बाजरी यांचा समावेश हवा. एका प्लेटमध्ये ४५% टक्के धान्य असावे. तर कडधान्ये १४% पुरेशी आहेत.

यानंतर डाळी, मांसाहार, अंडी, सुका मेवा आणि दूध, दही यांचा समावेश येतो. अंडी आणि मांसाहारासाठी एकूण ऊर्जा टक्केवारी १४-१५% इतकी असावी. (Daily Diet)

याशिवाय आहारात फॅट्स असावे. ज्यामध्ये शेंगदाणे, तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असायला हवे. एकूण ३० टक्के ऊर्जेसाठी यांचा समावेश महत्वाचा आहे.

रोजच्या आहारात साखर, मीठ आणि चरबी कमी करण्यासाठी अधिकाधिक फळे आणि भाज्या खाव्या. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्य तितके दूध, अंडी आणि मांस खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘अशी’ असावी रोजच्या जेवणाची थाळी (Daily Diet)

तज्ञांनी सांगितल्यानुसार, निरोगी जगायचे असेल तर आपल्या आहारात सर्व आवश्यक त्या पोषक घटकांचा समावेश असायला हवा. संतुलित आहारात ४५% पेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करू नये. तसेच यामध्ये कडधान्य, बीन्स आणि मांसमधून १५% कॅलरीज मिळतात. त्यामुळे आहारात यांचा समावेश करावा.

(Daily Diet) शिवाय भाज्या, फळे आणि पालेभाज्यांचा समावेश तर असायलाच हवा. आहाराचा सगळ्यात मोठा भाग हा धान्यांचा असावा. सोबत डाळी, मांसाहार, अंडी, सुका मेवा आणि तेलबिया आणि दूध यांचे सेवन जरूर करावे.