‘निपाह’चा धोका : साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे झाडाखाली पडलेली फळे न खाण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

नुकतेच सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या एका गुहेतील दोन वट वाघुळांमध्ये “निपाह’ हा विषाणू आढळून आला आहे.  याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. या निपाह विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता झाडांखाली पडलेली, पक्षांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे., असे सिह यांनी आवाहन केले आहे.

सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीबरोबर निपाहबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले. यावेळी ते म्हणाले, सध्या देशात निपाह रोगाचे विषाणू आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूबाबत अद्यापही राज्य शासनाने कोणत्याही स्वरूपाचे निर्देश दिलेले नाही.

सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी कोणत्याही स्वरूपाचे पक्षांनी खाल्लेली फळे तसेच झाडाखाली पडलेली फळे खाणे टाळावे. तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिह्यात आढळलेला नाही. संभाव्य तिसऱया लाटेशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कठोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.