जटवाडा रोडवर दरड कोसळली; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावातील मुख्य रस्ता असणाऱ्या जटवाडा रोडवर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना रविवारी घडली. काही वेळेतच वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

औरंगाबाद शहराला जोडणारा ग्रामीण भागातील हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे. खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावाजवळ मुख्य रस्ता जटवाडा रोडवर ही दरड कोसळली या ठिकाणी मोठी दुर्घटना होता होता टळली.आज रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे आज बहिणी सासरहुन माहेरी जाण्याची लगबग होती. यामुळे या रस्त्यावर सकाळपासून वाहनांची गर्दी आहे. अशातच मागील आठ दिवसानंतर आज पाऊस उघडल्यामुळे औरंगाबादला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त होती.
यावेळी रहदारीच्या रस्त्यावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोठी दरड कोसळली.
व मोठमोठी दगड रस्त्यावर पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी तात्काळ सय्यद आमेर यांनी जेसीबी च्या साहाय्याने मोठी मोठी दगडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी दुचाकी वाहन धारक काही काळ ताटकळून होते. मात्र काही वेळेतच वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी सय्यद आमेर, इसाक पठाण,जलील पठण, असलम पठाण आदीं गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Comment