हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून स्वारगेट एसटी स्थानक परिसरातील धक्कादायक बलात्कार प्रकरण जोरदार चर्चेत आहे. या घटनेमुळे आखा महाराष्ट्र हादरून गेला आहे. यातच आता नवनवीन खुलासे होताना दिसतायत . पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक गोष्ट समजली असून, यामुळे अनके प्रश्न उपस्थित होतायत. या माहितीत समोर आले आहे कि, आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरात फिरत होता. यासोबतच तो अनके ठिकाणी वावरत दिसला आहे.
पोलिसाचा गणवेश घालून वावरत होता –
तपासासाठी पोलिसानी दत्तात्रय गाडे याच्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले , त्यात तो स्वारगेट , शिवाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर आणि शिरूर एसटी स्थानकांमध्ये पोलिसाचा गणवेश घालून वावरत होता अशी माहिती समोर आली आहे. या सोबतच तो महिलांना लुटायचा. पोलीसाना आता असा देखील संशय आहे कि, गाडेने अजून काही गुन्हे केले असावेत . यासाठी गाडेविरोधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसाना सांगाव्यात , असे प्रत्येक नागरिकास आवाहन केले आहे. यामुळे त्याच्यावर असलेले गुन्हे समोर येणार मदत होणार आहे.
स्वारगेट येथील घटना –
स्वारगेट येथे एका तरुणीवर क्रूर नराधमी दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 13 पथकांची स्थापना केली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला होता. हा आरोपी त्यांना एका शेतात सापडला , त्यानंतर पोलिसानी गाडेला अटक केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.