पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये सासू सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून सुनेने सासूची हत्या ( Murder) केली आहे. सासूने घरात स्वयंपाक बनविला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळाले नाही यावरून सासू आणि सुनेचे मोठे भांडण झाले. याच वादातून सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूची हत्या ( Murder) केली. गुरुवारी रात्री चाकण या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे असे मृत सासूचे तर सुवर्णा सागर मुळे असे हत्या ( Murder) करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे.
मुलीला दुपारी जेवणात केवळ भात दिल्याने दोघींमध्ये वाद
हाती आलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते. गुरुवारी दुपारी सून सुवर्णा ही शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचे मुलीने सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर सुनेने रागाच्या भरात घरातील नायलॉन दोरीने मागून गळा आवळून सासूची हत्या ( Murder) केली.
मुलगा आणि सुनेची कसून चौकशी
या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शेंडकर व इतर रुग्णालयात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा सागर आणि तिची सून सुवर्णा यांची कसून चौकशी केली असता सुवर्णाने सासूचा गळा आवळून खून ( Murder) केल्याची कबूली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर