सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील मुंढे गावचे संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहिद झाले असुन सातारा जिल्हयासह गावकऱ्यांना संदिप यांचे पार्थीवाची प्रतिक्षा आहे. या ठिकाणच्या अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण झाली असून अंतिम संस्कार शुक्रवारी पार पडण्याची शक्यता आहे.
मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवासी आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.
शहिद संदीप सावंत हे नऊ वर्षापुर्वी लष्करात भरती झाले होते. त्यांचा तीन वर्षपुर्वी विवाह झाला असुन त्यांना दीड महिन्याची मुलगी असुन 15 दिवसापुर्वी बारसे करुन संदिप डयुटीवर हजर झाले होत.त्यांचे पशचात पत्नी, आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. माझा मुलगा देशासाठी शहिद झाला याचा अभिमान असलेची भावना वीरपिता रघुनाथ सांवत यांनी व्यक्त केली.