प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस; पोषण आहाराच्या पाकिटात सापडले मेलेल्या उंदराचे पिल्लू

Poshan Ahar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार हे देशातील विविध नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व गर्भवती महिलांना आणि बालकांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार अंगणवाडी शाळामधून वितरित केला जातो. गर्भवती महिलांचे चांगले पालन पोषण व्हावे, त्याचप्रमाणे एका सुदृढ बालकाचा जन्म व्हावा. यासाठी गर्भवती महिलांना देखील हा पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलांना देखील हा आहार दिला जातो. परंतु आता हा आहार गर्भवती महिला आणि बालकांसाठी किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अशी एक घटना घडलेली आहे. यामुळे सगळेच जण हादरून केलेले आहेत. जळगावात पोषण आहाराशी संबंधित एक प्रकार समोर आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये पोषण आहारात एक मेलेला साप सापडला होता. तसेच पुण्यातील एका शाळेमध्ये पोषण आहारामधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. आता जळगाव पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. ते म्हणजे आता जळगावतील पोषण आहाराच्या पाकिटात चक्क एक पेलेला पिल्लू सापडलेला आहे. त्यामुळे आता हा पोषण आहार आपल्या मुलांसाठी कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

जळगावातील नसीराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात एक मेलेल्या उंदराचे पिल्लू सापडलेले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यातील मिक्स तांदळाच्या पाकिटात हे पिल्लू आढळले आहे. गृहिणीच्या स्वयंपाका दरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. हा पोषण आहार आहे की बालकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. परंतु आता या प्रकरणी नक्की कारवाई होणार आहे का आणि कारवाई झाली तरी काय होईल? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.