कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात एका शेतातील विहिरीत सात महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा पडून मृत्यू झाला आहे. आज हि घटना उघडकीस आली असून वनविभागाने संबंधित बछड्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. नेहमीप्रमाणे काकडे पहाटे विहिरीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी गेले असता पाण्यात मृत अवस्थेत पडलेला मादी जातीचा बछडा दिसून आला. यानंतर याची माहिती त्यांनी आसपासच्या इतर शेतकऱ्यांना दिली तसेच वनविभागाला कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून कराड वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बछड्याला जाळीच्या साह्याने विहिरीतून बाहेर काढले. बिबट्याच्या बछड्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत. कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिजीत शेळके, सुभाष गुरव, सचिन खंडागळे, वनसेवक अमोल माने, धनाजी गावडे, भरत पवार, योगेश बडेकर, हनुमंत मिठारे यासह शेतकऱ्यांनी बछड्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पशूंची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आता कोणत्याही एजंट कडे जाण्याची गरज नाही. Hello Krushi या अँप वर तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरातील पशूंची खरेदी करू शकता आणि तुमच्या जनावरांची सुद्धा घरी बसून विक्री करू शकता. त्यामुळे कोणत्याही एजंटच्या मार्फत होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे हॅलो कृषी तुम्हाला हि सेवा अगदी मोफत मध्ये देत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे अँप डाउनलोड करून Install करा. अँप ओपन करताच तुम्हाला प्राणी खरेदी- विक्रीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच तुम्हाला हवी असलेली जनावरे, त्यांच्या मालकाचा मोबाईल क्रमांक आणि ठिकाण याबाबत सविस्तर माहिती मिळेल. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, तुमच्या आसपासची खत दुकाने, कृषी सेवा केंद्र यांची संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे आजच हॅलो कृषी मोबाइल मध्ये डाउनलोड करा.
हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here
विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्याचा मृत बछडा हा मादी जातीचा असून सात ते आठ महिन्यांचा आहे. या बछड्याचे अंदाजे 15 ते 20 किलो वजन असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. तसेच शिकारीच्या शोधात तो विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाजही अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.