सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविडमुळे आठ महिन्याची गरोदर स्त्री आणि तिचे दोन बाळांचा पोटातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी समजूत घातल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
तीस तारखेला महिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतः चालत येऊन ऍडमिट झाली होती. त्यानंतर काल सकाळी तिची प्रकृती बिघाडली होती. तिच्या पोटात असलेल्या बाळांसह तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबप्रमुख असलेल्या एका कुटुंबाचा पालन हार याचा मृत्यू झाला होता. त्याची चौकशी सिव्हिल सर्जन सुभाष चव्हाण यांनी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची चौकशी चालू असताना, तोपर्यंत दुसरा गरोदर महिलेचा पोटातील दोन बाळासह मृत्यू झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटल यांचा भोंगळ कारभार कधी थांबणार? अजून किती सिव्हिल हॉस्पिटल बळी घेणार असा प्रश्न सातारकर यांना पडला आहे.