माजी सैनिक, 42 वर्षे सरपंच असणारे गोविंदराव चव्हाण यांचे निधन

कराड । आरेवाडी (ता. कराड) गावचे माजी सरपंच गोविंदराव विठोबा चव्हाण (आण्णा) (वय 100) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आरेवाडीचे सरपंच म्हणून 42 वर्षे काम पाहणारे गोविंदराव चव्हाण हे एक माजी सैनिक होते.

गोविंदराव चव्हाण यांनी कराड तालुका पंचायत समिती 11 वर्षे सदस्य, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, भाग्यलक्ष्मी पाणी पुरवठा संस्था आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडीचे चेअरमन आदी पदे भूषविली.

माजीमंत्री तथा ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर), दिवंगत पी. डी. पाटील, भिमराव पाटील (दादा) यांच्यासोबत जिविद्राव चव्हाण यांनी विकासकार्य केले.