Tuesday, January 31, 2023

गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकांचा मृत्यू

- Advertisement -

कोल्हापूर | गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजीरा तथा दादा ईश्वर मोहिते (वय -७२ ) यांचे काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोकुळ दूध संघाच्या मतदानानंतर व्हेंटिलेटरवरील कोरोनाबाधित ठरावधारक दादा मोहिते यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी तीन ठरावधारकांचा मृत्यू झाला होता, मोहिते यांचा मृत्यू झाल्याने चार संख्या झाली आहे.

मोहिते हे अत्याळ येथील विठ्ठल सहकारी दूध संस्थेचे विद्यमान संचालक होते.त्यांच्या नावावर गोकुळचा ठराव होता. दरम्यान,कोरोनाच्या संसर्गामुळे आठ दिवसांपासून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासोश्वासाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

रविवारी, येथील एम.आर.हायस्कूलवर ‘गोकुळ’साठी मतदान झाले. दुपारी ४ नंतर कोरोना बाधितांना पीपीई किट परिधान करून मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार कोरोनाबाधित ५ ठरावधारकांनी मतदान केले.

व्हेंटिलेटरवर असतानाही मतदान.. ?

व्हेंटिलेटरवर असतानाही मोहिते यांनी मतदान कसे केले ? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत खोत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मोहिते हे व्हेंटिलेटरवर होते, काल त्यांचे निधन झाले आहे.