दुसऱ्या दिवशीही मृत्यूदर वाढला : सातारा जिल्ह्यात 692 पाॅझिटीव्ह तर 43 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 692 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 43 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. सलग 50 व 43 असे दोन दिवसात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण आले असून ते जादा आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 16 (9731 ), कराड 99 (37332 ), खंडाळा 25 (13668 ), खटाव 108 (23660 ), कोरेगांव 104 (20433 ), माण 62 (16376 ), महाबळेश्वर 1 (4561 ), पाटण 1 (9870 ), फलटण 100 (33779 ), सातारा 136 (48297 ), वाई 24 (15147 ) व इतर 16 (1833 ) असे आज अखेर एकूण 234687 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 1 (208), कराड 4 (1131), खंडाळा 2 (179), खटाव 3 (576), कोरेगांव 0 (441), माण 1 (355), महाबळेश्वर 0 (88), पाटण 2 (356), फलटण 18 (627), सातारा 12 (1415), वाई 0 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5803 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.