कराड | स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर असलेल्या कराड पालिकेची मोठी घसरण झालेली असून चाैथ्या क्रमांकावर गेले आहे. केंद्राच्या यंदाच्या 2021 सालच्या स्वच्छ सर्वेक्षणात विटा पालिकेने देशात पहिला क्रमांक पटकवला आहे. सासवड, लोणावळा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर आहेत. तर कराड चौथ्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाच्या सचिव व स्वच्छ सर्वेक्षणाच्या संचालक रूपा मिश्रा यांनी लेखी पत्रे पालिकांना पाठवली आहेत. त्या पत्रांत विजत्या पालिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचा थेट उल्लेख आहे. त्यात कराडचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थीत राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर केला जाणार आहे, असेही स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड व पाचगणी या पालिकांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे. त्यासह राज्यातील अन्य 22 पालिका, महापालिकांचा पुरस्कारात समावेश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत. 2019 व 2020 या सलग दोन वर्षात कराड पालिकेने देशात पहिला क्रमांक पटकावला होता. एक लाख पालिकेचा यंदा मात्र क्रमांक लोकसंख्येच्या पालिकात सलग दोन वर्षे पहिला क्रमांक पटकावणाऱ्या घसरला असून चाैथा क्रमांक आहे.