दिवाळीत अशा पद्धतीने करा तुमचे घर डेकोरेट; शेजारचे ही होतील थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी येत्या 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. यावर्षी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी आतापासूनच घर सफाई करणे, फराळ बनवणे, डेकोरेशन करणे अशा कामांना सुरुवात झाली आहे. दिवाळीत सर्वात आकर्षित ठरते ते म्हणजे आपले घर. दिवाळीमध्ये घर सजवण्यासाठी काहीजण अनेक वेगवेगळे प्रयोग करतात. तसेच, बाजारातून महागड्या वस्तू आणून घराची शोभा वाढवतात. परंतु आपण जास्त पैसे खर्च न करता देखील घराची शोभा वाढवू शकतो. तसेच आपल्या घराला सर्वात सुंदर घर बनवू शकतो. त्यासाठी फक्त पुढे दिलेल्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.

घर पणत्यांनी सजवा – दिवाळी म्हणजे दिव्याचा आणि प्रकाशाचा सण असतो. तुम्हाला जर दिवाळी तुमचे घर सुंदर आणि सुशोभित बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही लाईटच्या पणत्या वापरू शकतात. या लाईटच्या पणत्या सध्या बाजारात सर्वात जास्त विकल्या जात आहेत. लाईटच्या पणत्यांचा वापर तुम्ही हॉलमध्ये बेडरूममध्ये घराच्या परिसरात करू शकता. या पणत्या लावल्यानंतर तुमच्या घराची शोभा आणखीन वाढेल.

घरावर लाईटच्या माळा टाका – घर सुंदर बनवण्यासाठी घरावर तुम्ही लाईटच्या माळा टाकू शकता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जरी तुमचे घर लांबून पाहिले तरी ते त्याला आकर्षित वाटेल आणि तुमचे घर परिसरात सुंदर दिसेल. तुम्ही या लाईटच्या माळा झाडांवर देखील टाकू शकता. यामुळे तुमच्या घराच्या आवारातील रोषणाई टिकून राहील. सध्या अशा माळा बाजारात खूप कमी किमतीत सहज मिळून जात आहेत.

रांगोळी काढा – आपली दिवाळी रांगोळीशिवाय कधीच पुर्ण होउ शकत नाही. दिवाळीत रांगोळी काढली सर्वात आवडीचे काम समजले जाते. रांगोळी काढल्यामुळे घराचे अंगण सुंदर आणि प्रसन्न दिसते. यासाठी तुम्हाला फक्त बाजारात जाऊन रांगोळी साठी रंग आणण्याची आवश्यकता आहे. रंग आल्यानंतर तुम्ही रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईन नेटवर सर्च करून दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता.

नविन पडदे बसवा आणि त्यावर झेंडूच्या माळा टाका – तुम्ही जर तुमच्या घराला दिवाळीमध्ये नवीन पडदे बसवले तर त्यावर झेंडूच्या किंवा लाईटच्या माळा टाकायला कधीही विसरू नका. यामुळे तुम्हाला दिवाळीचे Vibes सहज मिळून जातील. झेंडूच्या फुलांमुळे तुमचे घर सजलेले दिसेल. ही झेंडूची फुले तुम्हाला बाजारात खूप कमी किमतीत सहज मिळून जातील.

शोभेच्या वस्तू आणा – दिवाळीच्या काळामध्ये घर सजलेले दिसण्यासाठी तुम्ही काही शोभेच्या वस्तू बाजारातून आणू शकता. घराची शोभा वाढवायची असेल तर तुम्ही झुंबर, मुर्त्या, नविन फर्निचर अशा गोष्टी घरात लावू शकता. यामुळे तुमच्या घराची शोभा आणखीन वाढेल. तसेच तुमचे घर भरलेले आणि सजलेली दिसेल.