Deepak kesarkar| शिक्षक भरतीसाठी जे लोक वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आता संचमान्यता सुधारित यांच्याकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येईल, अशी माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रात राज्य माध्यमिक शाळा शिक्षक इतर संघटनांचे महामंडळाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी विविध मागण्या केल्या . त्याचप्रमाणे पदभरतीची देखील मागणी केली.
या भेटीनंतर आता राज्यातील शिक्षकांची पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच संच मान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील भरण्यात येणार असल्याचे मंत्री यांनी सांगितलेले आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना मानधनात देखील वाढ करण्यात येणार आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील चांगली वाढ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची माहिती तसेच ते विषय विद्यापीठाला देण्यात येणार आहेत. मार्गदर्शकांना देखील शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संशोधन शाळा महाविद्यालयामधून संदर्भ ग्रंथ वापरण्यात यावे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली आहे.
हेही वाचा – Viral Video : आजोबांसाठी तो बनला थ्री इडियट्सचा रँचो, बाईकवरून गाठला थेट इमर्जन्सी वॉर्ड
राज्य मराठी विकास संस्थेची बैठक तीन महिन्यांनी आयोजित करून या बैठकीत सर्व मराठी भाषा प्रमुख यांना आमंत्रण देऊन त्यांना उपस्थित रहाण्यास सांगावे असे त्यांनी सांगितले. तसेच कवितेचे गाव असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभा दांडा येथे कामाला गती देण्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.
त्यांच्या या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देवल, तसेच मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, कार्यकारी समिती सदस्य डॉक्टर गणेश चंदनशिवे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामाकांत देवरे प्रशासकीय अधिकारी सदस्य सचिव गिरीश पतके हे उपस्थित होते.
या बैठकीचे उद्दिष्ट हे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावे हे होते. आणि या अनुषंगाने त्या बैठकीत आढावा घेण्यात आलेला आहे. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, “शिक्षण विभागाच्या विविध ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी पुस्तके आणि ग्रंथ वाचण्यासाठी ठेवावेत ग्रंथ तयार करताना याच्या शेवटच्या पानावर वाचणाऱ्यांच्या सोयीसाठी संक्षिप्त वर्णन द्यावे त्याचप्रमाणे ग्रंथसूची खंडाची नोंद घ्यावी.”