शिवसैनिकांनो, मुंबई असो वा ठाणे…; दीपाली सय्यद यांचे भावनिक पत्र

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड ठरले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्याने शिवसैनिकाना मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एका पत्रा द्वारे शिवसैनिकाना भावनिक आवाहन करत धीर दिला आहे.

आदरणीय शिवसैनिक, जेव्हा जेव्हा आपला महाराष्ट्र संकटात पडला शिवसेनेचा शिवसैनिक त्या संकटाला नडला.आज शिवसेना संकटातून संघर्ष करते, पक्षश्रेष्ठी व शिवसेनेचे नेते यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. आपणा सगळयांना विनंती आहे की या सर्व संकटातून शिवसेना मार्ग काढेल परंतु शिवसैनिकांनी त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपली शिवसेना आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळकट करा, असे आवाहन दीपाली सय्यद यांनी केले आहे.

पुणे असो वा ठाणे, मुंबई असो या नवी मुंबई संपुर्ण महाराष्ट्रत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहीजे. वरीष्ठ पातळीवरच्या राजकारणास दुर्लक्ष करुन शिवसैनिकांनी आपल्या शाखा आणि विभागात जनतेच्या सेवेसाठी उतरावे.जय महाराष्ट्र ! असे म्हणत दीपाली सय्यद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here