हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरीं केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना आपली आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावं लागेल अशा चर्चा होत्या. त्यानंतर शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे शिंदे गट मनसेत विलीन होणार का अशा चर्चा रंगल्या आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे.
मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे.

— Deepali Sayed (@deepalisayed) June 27, 2022
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रुग्णालयात घरी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना 2 वेळा फोन करून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची तब्बेत आणि सध्याच्या राजकीय घडामोडी यावर चर्चा केल्याचं समजत आहे. तसेच शिंदे गटाला आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. भाजप,प्रहार, मनसे असे 3 पर्याय त्यांच्यासमोर असून हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे वारस म्हणून शिंदे गट मनसे सोबत जाण्याची शक्यता आहे.