शहीद जवानांचे कुटुंब आणि भारतीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत; अमेरिकेचे सांत्वन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यात एका कमांडिंग ऑफिसरचा सुद्धा समावेश आहे. तर दुसरीकडे चिनी सैन्यालाही मोठं नुकसान झालं असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, या हिंसक संघर्षानंतर अमेरिकेनंही आपली प्रतिक्रिया देत शहीद झालेल्या भारतीय जवानांचे कुटुंब आणि भारतीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत, असं म्हटलं आहे. चीनचे अधिकारी यांग जियाची यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतरच त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. यांग जियाची हेच भारत चीन सीमाप्रश्नी वाटाघाटी करणारे चीनचे प्रमुख आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारत चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती दु:ख व्यक्त केलं. “चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांप्रती आम्हाला अतीव दु:ख झालं आहे. शहीद सैनिकांबरोबरच त्यांच्या जाण्याने दु:खी झालेले त्यांचे कुटुंबीय, जवळच्या व्यक्ती आणि समाजाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे,” असं पॉम्पिओ म्हणाले.

यापूर्वी भारत चीन संघर्षावर अमेरिकेची नजर असल्याचं म्हटलं होतं. तसंच शांततामय वातावरणात या प्रकरणी तोडगा काढण्याची आशाही अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेच्या गृह मंत्रालयानं “आम्ही एलएसीवर असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. भारतीय लष्कराचे २० जवान या चकमकीत शहीद झाले. त्यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो,” असंही त्यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

 

 

Leave a Comment