हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Deepika Padukone Pregnancy) बॉलीवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय कपल अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. या जोडप्याची ऑनक्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चर्चेत राहिली आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या दिप-वीरच्या जोडीने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. होय. तुम्ही बरोबर समजत आहात. लग्नाच्या सहा वर्षानंतर दीपिका आणि रणवीर आता आई- बाबा होणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर 2024’ असे लिहिलेले दिसत आहे. तसेच या पोस्टमध्ये खाली दीपिका आणि रणवीरचे नाव लिहिलेले दिसत आहे. या पोस्टमध्ये लहान बाळांचे गुलाबी, निळ्या रंगाचे कपडे आणि काही खेळण्यांची चित्र दिसत आहेत. दीपिकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच नेटकऱ्यांसह सिनेविश्वातील अनेक मंडळी या पोस्टवर दीप- वीरला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
रणवीर आणि दीपिका दोघेही बॉलीवूड सिने जगतातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांचा आपापला मोठा चाहता वर्ग आहे. तर या जोडीचादेखील चाहता वर्ग काही लहान नाही.’रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी लोकांना आवडते तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील कायम चर्चेत असते. दीपिका आणि रणवीर यांनी तब्बल ६ वर्ष एकमेकांसोबत डेटिंग केलं होतं. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर ६ वर्षांनी हलणार पाळणा (Deepika Padukone Pregnancy)
इटलीमध्ये अत्यंत भव्य स्वरूपात त्यांचा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. मध्यंतरी रणवीर आणि दीपिका यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता या आनंदाच्या बातमीमुळे इतर सर्व नकारात्मक बातम्या फोल ठरल्या आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या आयुष्यात छोटा पाहुणा येणार या बातमीने चाहते अगदी आनंदून गेले आहेत. या वर्षातील ही बातमी दीपिका आणि रणवीर यांच्या नात्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती छोट्या पाहुण्याची.