पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील थेरगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जन्मदात्या नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या सराईत गुन्हेगार असणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केले आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. आरोपी बाप आणि फिर्यादी महिला यांना एक 14 वर्षांची मुलगी आहे. फिर्यादी महिला घरी नसताना आरोपी पीडित अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करीत असे.आरोपीने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले.
यानंतर पीडित मुलीने तिच्या आईला याबाबतची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. आरोपी नराधम बाप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लुटमार करून जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.