राजनाथ सिंह २ दिवसांच्या लडाख, जम्मू काश्मीर दौऱ्यावर

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लडाख । पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, या भागातील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळीच लडाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे सुद्धा आहेत. राजनाथ सिंह लडाख, जम्मू काश्मीर दौऱ्यात LAC सोबतच LoC देखील जाणार आहेत.

यावेळी पॅराशूट रेजिमेंच्या कमांडोजनी त्यांच्यासमोर पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरण्याचे आपले कौशल्य सादर केले. राजनाथ सिंह या दौऱ्यात अधिकारी आणि कमांडर्सकडून लडाखमधील सध्याची परिस्थिती समजून घेतील तसेच जवानांचे मनोबलही वाढवतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखचा दौरा करुन जवानांचे मनोबल उंचावले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे लेहच्या स्ताकना भागामध्ये आहेत. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोजनी राजनाथ सिंह यांच्यासमोर आपले पॅरा जम्पिंगचे कौशल्य सादर केले. राजनाथ सिंह नियंत्रण रेषेजवळील भागांनाही भेट देणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here