हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या घरी जाऊन भेट दिली. तसेच उद्या या घटनेची माहिती संसदेत देणार असल्याची माहिती दिली.
अपघातानंतर सीडीएस बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील आर्म्ड फोर्सचं महाविद्यालयात एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जाणार होते. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.
Delhi | Defence Minister Rajnath Singh reaches the residence of CDS Bipin Rawat pic.twitter.com/05DismLAq9
— ANI (@ANI) December 8, 2021
दरम्यान, केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी लष्कर अधिकाऱ्यांशी बैठक घेत या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री सिह यांनी अधिकारी रावत यांच्या घरी जाऊन सुमारे पंधरा मिनिटे कुटूंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर मंत्री सिह यांनी वायू दलातील अधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून यात दुर्घटनेची माहिती घेतली आहे. दरम्यान मंत्री सिह यांच्याकडून उद्या या दुर्घटनेची माहिती संसदेत दिली जाणार आहे.