UPI Payment : बँक खातं नसतानाही करता येणार UPI पेमेंट? काय आहे NPCI चा प्लॅन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे आधुनिक जग असून आजकाल पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे. UPI च्या माध्यमातून (UPI Payment) हे पेमेंट केलं जात. मात्र जास्तीत जास्त लोकांनी UPI चा वापर करावा यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) वेळोवेळी UPI पेमेंटमध्ये बदल करत असते. आताही असाच एक बदल करण्यात आला असून या नव्या बदलाचा फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण इथून पुढे बँक खाते नसले तरी सुद्धा UPI पेमेंट करता येणार आहे. हे कस शक्य आहे? याचा फायदा कसा आणि कोणाला होणार? याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊयात.

‘डेलिगेटेड पेमेंट सिस्टम- (UPI Payment)

सध्या, UPI वापरण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असायला पाहिजे असा नियम आहे. तरच तुम्ही UPI खाते तयार करू शकता आणि गुगल पे, फोनपे सारख्या काहीं ॲप्सच्या मदतीने डिजिटल पेमेंट करू शकता. पण NPCI या सेवेचा आणखी विस्तार करत आहे आणि ज्यांचे बँक खाते नाही ते देखील UPI चा वापरू शकतील. UPI मध्ये बदल करण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक मोठे कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. ‘डेलिगेटेड पेमेंट सिस्टम’ असे या नव्या सिस्टीमचे नाव आहे. (UPI Payment)

या नवीन डेलीगेटेड पेमेंट सिस्टमच्या मदतीने, कुटुंबातील सदस्यांचे स्वतःचे बँक खाते नसले तरीही ते एकच UPI ​​अकाउंट वापरू शकतील. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील एका सदस्याचे बँक खाते असेल आणि UPI सेवा त्यात ऍक्टिव्ह असेल, तर इतर लोक देखील त्यांच्या फोनवरून त्याच UPI खात्यातून पेमेंट करू शकतील. मात्र याठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा कि हे फक्त बचत सेव्हिंग अकाउंट साठीच असेल, क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज खात्यांसाठी नाही. तसेच ज्या व्यक्तीचे UPI खाते हे ती व्यक्ती हे सर्व पेमेंट कंट्रोल करेल आणि तो इतर लोकांना पेमेंट करू देऊ शकेल. NPCI ला आशा आहे की ही ग्राहकांना सेवा प्रदान दिल्यानंतर UPI पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच काय तर जास्तीत जास्त लोक UPI पेमेंट वापरतील.