ट्विटर ची टिव-टिव आणि विमानतळ झालं स्वच्छ..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

समाजमाध्यमांचा परिणामकारक वापर प्रेरणादायी

दिल्ली | विमानतळावरील फरशीच्या कार्पेटवर चिखलाचे डाग दिसत असूनही त्याबाबत कारवाई केली जात नसल्याने व्यथित झालेल्या सुयश गुप्ता यांनी एक संदेश ट्विटर वर पाठविला. सदरचं ट्विट जयंत सिन्हा व दिल्ली विमानतळ प्रशासनाला उद्देशून केलं होतं.

“इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकालाच येथील परिसर स्वच्छ व्हावा असं वाटत आहे. येथून वावरताना दुर्गंधीही खूप पसरल्याची जाणीव होत आहे. आम्हाला पैसे देऊनसुद्धा अशी सुविधा मिळू नये अशी प्रार्थना करण्याची वेळ येऊ देऊ नका. अनेक चांगल्या विमानतळांवर फरशी असल्याने ती स्वच्छ करण्यात अडचणी येत नाहीत,असंही गुप्ता पुढे म्हणाले. या ट्विटची तात्काळ दखल घेऊन प्रशासनानं अंशतः तो परिसर स्वच्छ केला.

दिल्ली विमानतळाच्या क्रमांक ३ वरील टर्मिनलवर सदर प्रसंग घडला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्वानपथकांचा गराडाही वाढला असून त्याचा अडथळाही बऱ्याच प्रमाणात जाणवत आहे. सदर कार्पेट बदलण्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. दरम्यान समाजमाध्यमांचा प्रभावी वापर यानिमित्ताने चर्चेचा विषय होत आहे. एका ट्विटची सतर्कता काय करु शकते, याची उदाहरणे मागेही पाहिली गेली होती. आज पुन्हा त्याचा अनुभव आला.

Leave a Comment