दिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा राहणार संघाबाहेर

Rishabh and Shreyash
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ मुंबई खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू न शकलेला दिल्लीचा आक्रमक विकेट किपर फलंदाज ऋषभ पंत तब्बल एक आठवडा खेळू शकणार नसल्याचे कर्णधार श्रेयस अय्यरनं सांगितले. पंतला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात वरुण अॅरॉनचा कॅच घेताना पंतला दुखापत झाली. त्यानंतर रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पंत ऐवजी रहाणेला संघात जागा देण्यात आली. अय्यर म्हणाला की, “मी डॉक्टरांशी बोललो आहे. पंतला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मला विश्वास आहे की, पंत जोरदार कमबॅक करेल”.

रिषभ पंत दिल्लीकडून सर्वात जास्त धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असून पंतने आतापर्यंत 35.20च्या सरासरीनं 6 सामन्यात 176 धावा केल्या आहेत. पंतच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेला दिल्लीच्या संघात स्थान मिळालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’