हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स साठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलने कोरोनावर मात केली असून लवकरच तो संघात परतणार आहे.दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन अक्षर परतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. माणसं बघूनच मला आनंद होत आहे, अशी भावना अक्षरनं यावेळी व्यक्त केली.
📹 | Smiles and hugs all around as Bapu returned to the DC camp 😁🤗
Oh, how we missed you, @akshar2026 💙
P.S. Kya challlaaaaa? 🤭#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCAllAccess @OctaFX @ITCGrandChola pic.twitter.com/wRl1I1M5dW
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2021
अक्षर पटेल गेल्या २८ मार्चला संघात सहभागी झाला होता. करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र ३ एप्रिलला केलेल्या चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याला करोनाची साधी लक्षणं दिसत होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला पुढील तपासणीसाठी पाठवलं होतं. तिथे अक्षर पटेलवर तीन आठवडे यशस्वी उपचार केले. आता करोनावर मात करुन अक्षर पटेल पुन्हा एकदा संघात सहभागी झाला आहे.
अक्षर पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल हे दोघं कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता हे दोन्ही खेळाडू त्यांच्या टीममध्ये परतले असून त्यांच्या टीमकडून खेळत आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.