हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 स्पर्धा मध्यात आली असतानाच दिल्ली कपिटल्स संघातील सदस्याला कोरोनाची बाधा झली आहे. दिल्ली कपिटल्सच्या एका नेट बॉलरला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर टीमला हॉटेलच्या खोलीत बंद राहण्याचे आदेश देण्यात आले.
दिल्लीचे आजच्या सामन्यासह 4 सामने बाकी आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून संघाने आत्तापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आज दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्स बरोबर असून 2 नेट बॉलरला लागण झाल्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्याच्या वेळापत्रकावर परिणाम होईल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
याआधीही 20 एप्रिल रोजी दिल्ली संघात कोरोनाचे काही रुग्ण आढळले होते. संघातील कोरोना पॉझिटिव्हची ही आठवी घटना आहे. याआधी, फिजिओ पॅट्रिक फरहार्ट, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टिम सेफर्ट यांच्यासह स्टाफ सदस्यांना देखील संसर्ग झाल्याचे आढळले होते.