लो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरु असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार आम आदमी पार्टी बहुमत मिळवताना दिसत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्ष 15 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दिल्लीतील भाजप कार्यालयात एक पोस्टर लावण्यात आले होते, ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र आणि पोस्टरवर लिहिले आहे की, ”विजयाने आम्ही कधी अहंकारी होत नाही आणि पराभवाने आम्ही निराश होत नाही.”
मतमोजणीपूर्वी भाजपा नेत्यांना विश्वास होता की दिल्लीत पक्ष सरकार स्थापन करू शकेल. मात्र, या मतमोजणीच्या कल लक्षात घेता भाजप पराभव स्वीकारताना दिसत आहे. मतमोजणीत सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षाची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. सध्या आम आदमी पक्षाच्या संभाव्य विजयामुळे आणि आपच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे.
2013 आणि 2015 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीची जागा जिंकली होती. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी ही जिंकली होती.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील एकूण मतदारांची संख्या 1,46,92,136 इतकी असून त्यांनी 2,689 ठिकाणी स्थापन केलेल्या एकूण 13,750 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला आहे. राष्ट्रीय राजधानीत महिला मतदारांची संख्या, 66,35,635.असून पुरुष मतदारांची संख्या 80,55,686 इतकी आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.